मुरूम (प्रतिनिधी)- येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. शीला स्वामी यांची नुकतीच सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याचे पत्र विद्यापीठाकडून कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांच्याकडून प्राप्त झाले आहे.
स्वामी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्तरावर विविध प्रकारच्या समित्या व उपक्रमांमध्ये उत्कृष्ट सहभाग नोंदवला आहे. त्यांनी जिल्हा समन्वयक, सल्लागार व एनएसएस कार्यक्रमाधिकारी म्हणून सर्वोत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, संचालक डॉ. सतीश शेळके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. सुभाष हुलपल्ले आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
