कळंब (प्रतिनिधी)- आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समिती सभागृहात शांतता समिती व शिवजयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी दि. 12 फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक अजित जिंकले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीत उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत शांततेत आणि उत्साहात शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी डी.जे. व डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, महापुरुषांच्या जीवनावर आधारित देखावे सादर करावेत, असेही यावेळी सांगण्यात आले. या बैठकीस पोलीस निरीक्षक चिंतले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे, पोलीस उपनिरीक्षक घाडगे यांच्यासह कळंब शहरातील सर्व शिवजयंती मंडळांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top