भूम (प्रतिनिधी)-  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धाराशिव व तालुका ग्रंथालय संघ वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने 14 व 15 फेब्रुवारी असे दोन दिवस धाराशिव ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

अजिंक्य विद्या मंदिराच्या प्रांगणात हा ग्रंथोत्सव होणार आहे. शनिवारी (ता.14) सकाळी ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे हस्ते होणार असून, यावेळी मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार प्रा. तानाजी सावंत, आमदार कैलास पाटील, आमदार प्रविण स्वामी, आमदार सतिष चव्हाण, आमदार विक्रम काळे आदी उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या ग्रंथोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.14) सकाळी ग्रंथदिडी काढण्यात येणार आहे. दुपारी वाचन संस्कृती व आजची स्थिती या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दुपारी तीन वाजता कथकथन होणार आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन कार्य याविषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी तीन वाजता कवी संमेलन आयोजीत करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवा निमित्त आयोजीत परिसंवाद चर्चासत्रात कवी संम्मेलन यासाठी राज्यातील नामांकित विचारवंत साहित्यिक कवी उपस्थित राहणार आहेत. जिल्हयातील ग्रंथप्रेमी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमंत ढाकणे यांनी केले आहे.


 
Top