कळंब (प्रतिनिधी)-  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कळंब आगारात यंदा उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून शिवजयंती समिती 2026 ची स्थापना करण्यात आली आहे. विविध सामाजिक उपक्रमांसह जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी समिती सज्ज झाली आहे.

समितीच्या अध्यक्षपदी आबासाहेब चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून श्रीमंत जाधवर, कैलास आगे, शिवाजी बांगर, गणेश गोरे, नितीन गायकवाड, सचिन गिरी आणि विनोद लव्हारे यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून बळीराम कवडे (गुरुजी), संदीप काळे, उत्रेश्वर डिसले, शिवाजी कदम, लखन गव्हाळे, राहुल गायकवाड व चेतन गोसावी, महेश थोरबोले हे  कार्यरत आहेत.

महिला संघटक म्हणून राजकन्या गवळी, एस. ए. औसेकर, सीमा भिसे, प्रियांका शिंदे व शेख मॅडम यांची निवड झाली असून महिला प्रतिनिधी म्हणून वंदना पलके, संध्याराणी झोंबडे, आशा भोसले, निवेदिता रणदिवे आणि सारिका गोरे यांचा समावेश आहे. सचिवपदी गणेश काळे तर सहसचिव म्हणून निखिल आडसुळ, सुभाष भोसले, बालाजी बोराडे, इजास शेख, संतोष कांबळे, जी. एम. कांबळे, किरण भातलवंडे, सज्जन भांगे, ज्योतिराम तौर आणि मेहबूब बागवान काम पाहणार आहेत.

प्रसिद्धी सचिव म्हणून ऋषी पवार, राम माळी, संजय सावंत, गणेश लवटे आणि सुषेन गिरी तर संघटक सचिव म्हणून भास्कर पिंगळे, बाळासाहेब कवडे, महादेव देटे, अमोल बारकुल, पंडित वणवे, एस. एस. पंडित, राजा नागटिळक, संजय पांढरे आणि मोसिन शेख यांची निवड झाली आहे. कोषाध्यक्षपदी अशोक वटाने, मनोज मुळीक व महेश थोरबोले यांच्याकडे आर्थिक जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या समितीला आगार व्यवस्थापक विनोद अलकुंटे, लेखाकर नितीन कांबळे , सहाय्यक वाहतूक निरीक्षक निलेश जाधव आणि सूरज पायाळ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच उमाकांत गायकवाड, शिवाजी करंजकर, वरुण गायकवाड, सुशील हुंबे, अनिल बांगार, महादेव कदम, बाबासाहेब धावारे, दत्तात्रय मुंडे, रामलिंग जाधवर, सुबोध रणदिवे, महादेव तांबडे, ज्ञानदेव कासार, किरण शिंदे, सुहास सारंग (भोसले), सुनील जगताप, सुनील बारकुल, अशोक लाड आणि अमोल पांढरे यांच्यासह अनेक सदस्यांचा सहभाग आहे. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 19 फेब्रुवारी रोजी कळंब बस स्थानकात भव्य रक्तदान शिबिर पार पडणार आहे. समाजहिताचा संदेश देणाऱ्या या उपक्रमानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top