परंडा (प्रतिनिधी)- परांडा प्रतिनिधी -दि.19 फेब्रुवारी 2026 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली व अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने, मराठी भाग प्रमुख डॉ.गजेंद्र रंदील ,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.अरुण खर्डे ,कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि संस्थेचे अध्यक्ष कै.रा.गे.शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. महेश कुमार माने महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांच्यासह कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
