तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हयाचे लक्ष लागलेल्या तेर गटात भाजपच्या अर्चनाताई पाटील 2360 मतांनी विजयी झाल्या.तेर गटात भारतीय जनता पार्टीच्या  अर्चनाताई पाटील यांना 7597 मतदान मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( शरदचंद्र पवार) गटाच्या सक्षणा सलगर यांना 1253 मतदान मिळाले. तर शिवसेना उबाठाच्या किर्तीमाला खटावकर यांना 5237 मतद़ान मिळाले. तर आम आदमी पार्टी तर्फे रत्नमाला पिंपळे यांना 181 तर नोटाला 82 मतदान झाले.

तेर गणात युती पुरस्कृत जया नाईकवाडी 1626 मतानी विजयी झाल्या विजयी झाल्या. तेर गणात युती पुरस्कृत जया नाईकवाडी यांना 3345 मतदान मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) च्या प्रिती आंधळे यांना 882 मतदान मिळाले. तर शिवसेना उबाठाच्या सोनाली पांगरकर यांना 1719 मतदान मिळाले. तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या  सुप्रिया देवकते यांना 1032 मतदान मिळाले. तर नोटाला 142 मतदान झाले. तर आळणी गणात भाजपच्या सुरेखा गवाड 217 मतांनी विजयी झाल्या. आळणी गणात भारतीय जनता पार्टीच्या सुरेखा गवाड यांना 3628 मतदान मिळाले. तर  शिवसेना उबाठाच्या सोनाली वीर यांना 3411 मतदान मिळाले. तर नोटाला 181 मतदान झाले. 


 
Top