उमरगा (प्रतिनिधी)- मायक्रोकॉम कंम्प्युटर एज्युकेशनचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला यांना पुणे येथील ग्लोबल इलाईट मेडीया अँड टेकच्यावतीने दिला जाणारा संगणक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आय.टी. एक्सलंस महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार 2026 देण्यात आला. हा पुरस्कार प्रसिद्ध सिनेअभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या हस्ते रविवारी दि. 1 फेब्रुवारी रोजी हिंजवडी (पुणे) येथे देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्याला उद्योजक तथा संचालक महेश व्यवहारे आणि कार्तिकेश बोरकर यांची विशेष उपस्थिती लाभली. मायक्रोकॉम ही संगणक संस्था गेल्या 26 वर्षापासुन कार्यरत असुन या संस्थेस यापुर्वी अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले आहे. या संस्थेच्या माध्यमातुन जिल्ह्यातील दहा हजार विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्यात आले. अनेक बेरोजगार युवकांना संगणक कोर्सच्या माध्यमातुन रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
या पुरस्काराबद्दल आमदार प्रविण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, नगरसेवक विजय दळगडे, प्राचार्य दिलीप गरुड, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे, अध्यक्ष धनंजय मेनकुदळे, सचिव राजु जोशी, प्रा. शौकत पटेल आदींनी अभिनंदन केले आहे. या पुरस्काराबद्दल मायक्रोकॉम संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमासाठी सचिन नाईक, सुप्रीया नाईक यांनी पुढाकार घेतला. गणेश मोडवे यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले.
