धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्तातील आळणी येथील आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,आळणी येथे युनिसेफ स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थे अंतर्गत लिंग समभाव व स्त्री-पुरुष समानता या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास जिल्हा समन्वयक श्रीमती. उमा शितोळे यांनी गावातीला पालकांना व माता पालकांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी संवादक श्रीमती स्वाती सोमनाथ सुळ, भाग्यश्री सचिन लंगाळे, सरस्वती श्याम कामटे, संतोषी सोमनाथ बनसोडे व रेश्मा प्रदीप माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात गावातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीने झाली. या प्रभात फेरीत “मुलगी वाचवा”, “स्त्री-पुरुष समानता”, “लिंगभेद नको” लेक वाचवा लेक शिकवा अशा घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यानंतर उपस्थित सर्व गावकऱ्यांसमवेत स्त्री-पुरुष समानतेची शपथ घेण्यात आली. समाजात समानतेची भावना रुजविण्यासाठी अडथळा शर्यत हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या शर्यतीत स्त्री व पुरुषांनी समान सहभाग नोंदवत एकोप्याचा व समानतेचा संदेश दिला.व स्त्री पुरुष सामानतेचा संदेश दिला
या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बशीर तांबोळी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ. संजीवनी पौळ, उपाध्यक्ष सौ. अफसाना शेख, तंटामुक्तीचे अध्यक्ष शाम लावंड, ग्रामपंचायत सदस्य अक्षय कदम,सदस्य महेश वीर, अनिता पौळ,उषा यादव, यांच्या सह मोठ्या संख्येने पालक सदस्य,तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
