धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळांनी आयोजित केलेल्या 2025-26 या वर्षातील बॅडमिंटन स्पर्धेमध्ये तिन्ही गटामध्ये प्रथम विजेतेपद ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी मिळून प्रथम विजेतेपद मिळविण्याची हॅट्रिक साधली आहे.
पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, पुरुष जम्बल अशा वेगवेगळ्या तिन्ही गटांमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये बक्षीस स्वीकारताना सोबत राजवीर, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. अमोल वरुडकर, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष रामचंद्र गरड, ॲड. कैलास बागल,ॲड. अनिकेत देशमुख, ॲड. रमेश वट्टे, ॲड. दत्तात्रेय कुलकर्णी, ॲड. काजळे बापू, ॲड, समाधान टेकाळे, ॲड. सुधीर तानवडे, ॲड, संकेत तांबे, ॲड. अजय पाटील तसेच इतर विधीज्ञ बांधव.
