धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही पी शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजी नगर रोड,धाराशिव येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत श्री साई जनविकास कृषी महाविद्यालयाचे मौजे शिंगोली येथे विशेष निवासी सात दिवस शिबिराचे आयोजन दिनांक 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान संस्थेचे मार्गदर्शक डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. योगिता राहुल शिंदे, सरपंच शिंगोली यांच्या हस्ते संपन्न झाले, याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एच. पाटील हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री. नलावडे व्ही. व्ही., ग्राम विकास अधिकारी, श्री. दिलीप वाघमारे, माजी तहसीलदार, सौ. फुलण मगर,. श्री. गणपत मगर, गोरे पी. व्हि., प्राचार्य, सरस्वती प्रायमरी स्कूल, सौ. अलका मगर, श्री. रावसाहेब शिंदे, श्री. चौधरी सर, श्री नेताजी शिंदे, श्री.रणजीत पडवळ, श्री.नरेंद्र सूर्यवंशी तसेच श्री. पाटील सर यांची उपस्थिती होती. प्राचार्य क्रांतीकुमार पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना आयोजित करण्यामागचा हेतू तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्टे यांच्या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. शेख यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले. या शिबिरा मार्फत होणाऱ्या उपक्रमांची माहिती कार्यक्रमाधिकारी डॉ. गांधले यांनी दिली, शिंगोली या गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना शिबीर अंतर्गत गावांमध्ये श्रमदान, वृक्षरोपण, महिला सुरक्षा काळाची गरज यासारखे पथनाट्य, रक्तदान व जनजागृती रॅली इ. कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
तसेच या कार्यक्रमांतर्गत शेती निगडित विविध बाबींवर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या उद्घाटन शिबिरात महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. घाडगे एच.एस., प्रा. माळी पी.पी., मुंडे एन. ए., डॉ शेख ए. एस.,प्रा. भालेकर एस. व्ही., खोसे पी.जे., प्रा. मगर पी. एस., प्रा. गोटे पी. पी., प्रा. नागरगोजे व्ही. टी. इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्ताविका चौधरी यांनी केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण ढगे आणि प्रणिता सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रा. भालेकर एस. व्ही. मानले.
