धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय युनानी दवाखाना ताकविकी जि. धाराशिव येथे बुधवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी  जागतिक युनानी दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून युनानी विशेषज्ञ तथा महाराष्ट्र युनानी मेडिकल संघटनेचे अध्यक्ष डॉ. शकील अहमद खान उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच छाया तरंगे, उपसरपंच अहेमद पठाण, अण्णा तरंगे, रियाज पठाण, असेफ पठाण, कुमार बायस व इतर जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमात युनानी चिकित्सा पद्धतीचे महत्त्व याबाबत विशेष माहिती देऊन रुग्णांना युनानी चिकित्सा पद्धतीचा उपयोग करण्या विषयी डॉ शकील खान सरांनी मार्गदर्शन केले.. यात एकूण 230 लोकांची तपासणी करण्यात आली.

वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती गजधने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी औषधं निर्माण अधिकारी श्रीमती पवार, संदीप जगताप यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व योगाचे प्रात्यक्षिक श्रीमती घुटे यांनी केले. 


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top