धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक वेशभूषा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय देण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, विविध विषयांवर आधारित कवितांचे सादरीकरण, पारंपरिक विषयावर आधारित नृत्य प्रदर्शन, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या विचारांची मांडणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांनी केली. कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, कार्यक्रमाचे परीक्षक डॉ बालाजी गुंड, डॉ स्वाती जाधव,प्रा माधव उगिले यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा विवेकानंद चव्हाण, तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ मंगेश भोसले, डॉ अरविंद हंगरगेकर यांनी पुढाकार घेतला. यावेळी आनंद नगर पोलिस स्टेशनचे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले. पारंपरिक वेशभूषा दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top