धाराशिव (प्रतिनिधी)- अपंग अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षा वृंदावनी बाळासाहेब गवळी यांचे दि. 4 फेबु्रवारी रोजी सोलापूर येथे उपचार सुरू असताना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांनी अपंग अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीमार्फत अनेक अपंग बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला. दि. 5 फेबु्रवारी रोजी दुपारी 1 वाजता कपिलधारा स्मशानभूमी, धाराशिव येथे वृंदावनी गवळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील राजकीय मंडळी, नातेवाईक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
