धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा धाराशिव तर्फे दिनांक 23 आणि 24 फेब्रुवारी 2026 रोजी निरंतर परिचर्या प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी रित्या आयोजित करण्यात आली.
सदर कार्यशाळेकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उप अधिष्ठाता उज्वला गवळी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी परिचर्या व्यवसायामध्ये निरंतर प्रशिक्षण या संकल्पनेचे प्रकर्षाने स्वागत केले व रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्याकरिता या कार्यशाळेचा सर्व परिचारिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. त्याचबरोबर सुधारीत कौशल्ये, तंत्रज्ञान व नवीन उपचार पद्धती विकसित करण्याकरिता अशा कार्यशाळांची सातत्याने गरज असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष कान,नाक,घसा विभागप्रमुख डॉ.सचिन देशमुख यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूरच्या राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे यांनी संघटनेचा ऐतिहासिक प्रवास आणि परिचारिकांच्या समस्या व मागण्या यामध्ये संघटनेची ठोस भूमिका विशद केली.
सदर कार्यशाळेला स्त्री रुग्णालय धाराशिवच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता गवळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपाधिष्ठाता डॉ. प्रवीण डुमणे व जिल्हा रुग्णालयाच्या अधिसेविका सुमित्रा गोरे या उपस्थित होत्या. “परिचर्या व्यवसायातील संवाद कौशल्य“ विषयावरील आयोजित कार्यशाळेस जिल्हाभरातून शासकीय कंत्राटी व खाजगी आरोग्य संस्थांतील तब्बल जवळपास 500 परिचारिकांनी हजेरी नोंदवली. सदर कार्यशाळा यशस्वीतेसाठी संघटनेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य सहसचिव जयश्री हेंडगे, राज्य उपाध्यक्ष सुनील कुंटे, धाराशिव शाखेच्या अध्यक्ष मीना सूर्यवंशी, उपाध्यक्ष गोविंद शेळके, शाखा सचिव रेखा मुळे, सहसचिव नीता मोरे, खजिनदार मीनाक्षी गुळवे, सहखजिनदार रंजना राठोड आणि शैलजा कोल्हाळ यांनी अथक प्रयत्न केले.