वाशी (प्रतिनिधी)- मराठी भाषा गौरव दिन जि.प.प्रा.शा.पार्डी येथे उत्साहात साजरा कराज्यात आला.त्यानिमित्त विद्यार्थी हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारीत स्वतःचे लिखाण केले.ते एकत्रीत करून अंतरंग सजावट,मलपृषठ,मुखपृष्ठ सजावट करुन पुस्तक स्वरुपात हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. आपणही पुस्तकातील लेखकाप्रमाणे धडे, कविता लिहू शकतो अर्थात लेखन करु शकतो हा आत्मविश्वास या हस्तलिखितामुळे विद्यार्थ्यांमधे रुजला. आपलंच पुस्तक ही भावनाच,हा अनुभवच विद्यार्थ्यांना भावी आयुष्यातील लेखनाच्या पहिल्या पायरीवर नकळतच पोहोचवून गेला. हस्तलिखित हा एक असा सर्वव्यापी उपक्रम आहे की ज्यामधे स्पर्धा नसते, पहिला दुसरा नंबर नसतो त्यामुळे  कधीच कोणत्याही सृपर्धेत सहभागी न होनारे विद्यार्थीही उत्साहाने सहभागी होतात.

यानिमित्ताने मराठी भाषेची थोरवी सांगणारे सुमधूर गीते गायली व ऐकली. वि.वा.शिरवाडकरांसह इतर कांही कवि, लेखक व त्यांचे साहित्य या संदर्भाने विद्यार्थ्यांनी माहिती संकलित करून सादर केली. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम नागटिळक यांच्यासह  उर्मिला भोसले- कावळे,बापूराव कात्रे ,राणी येवले, गंगासागर आखाडे,वैभव सोनवणे यांनी प्रयत्न केले. 


 
Top