धाराशिव (प्रतिनिधी)- आजच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच साहित्याचे वाचन अफाट करावे व आपल्या परिसरात एखादी कोणतीही घटना घडत असेल तर तिच्याकडे एका संवेदनशील मनातून पाहावे व त्यावर विचार करावा आणि लिहिते व्हावे. संवेदनशील मन असेल तर साहित्य लिहिता येते असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना मराठी विभाग प्रमुख प्रा.राजा जगताप यांनी केले आहे. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन समारंभ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य प्रो.छाया दापके होत्या. प्रारंभी प्रमुख मान्यवरांनी वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले. पुढे बोलतांना प्रा.जगताप म्हणाले की, कुसुमाग्रज यांनी विपुल प्रमाणात काव्य लेखन केल्याने व त्यांच्या कवितेने मराठी माणसांच्या मनावर गारुड घातले होते. त्यांची स्वतंञ्य देवतेची विनवणी ही कविता मराठी माणसाच्या घराघरात पोहोचली होती. अध्यक्षीय समारोप करताना प्रो.डॉ. छाया दापके म्हणाल्या की, वि. वा. शिरवाडकर यांच्या कवितेने देशाभिमान जागृत केला व त्यांची कविता मराठी माणसाच्या मनावर सतत हुकूमत गाजवत आलेली आहे.
यावेळी मराठी विभागाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील लेखक लेखिका यांच्या कवितेचे विद्यार्थ्यांना संकलन करायला लावून गुलमोहर भीतीपत्रिकेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे प्रकाशन प्र. प्राचार्य प्रा.डॉ.संदीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. भित्तिपत्रिका तयार करण्यासाठी प्रा. डॉ. वैशाली बोबडे यांनी सहकार्य केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालनप्रा.डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले. आभार मराठी विभागाचे प्रा सुशेन जाधवर यांनी मानले. यावेळी देडे, प्रा.सुवर्णा गेंगजे यांचेसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
