तेर (प्रतिनिधी)- चोरट्यांनी अडवून सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून नेल्याची घटना 12 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता तेरणा धरणाजवळ घडली.
सतिष विठ्ठलराव दंडनायक रा.पळसप हे तेरहून तेरणा धरणाककडून कोल्हेगावकडे स्कुटीवरून जात असताना तेरणा धरणाजवळ पाठीमागून मोटर सायकलवरून दोघेजण आले.सतिष दंडनायक यांना थांबा म्हणाले. त्यानंतर दुसऱ्या मोटार सायकलवरून दोघे आले.त्यांनी सतिष दंडनायक यांना बोटातील दोन्ही अंगठया काढून द्या म्हणाले व दोघांनी त्यांना पकडून बोटातील सोन्याच्या दोन अंगठ्या काढून घेतल्या. सोन्याच्या अंगठया एक चार ग्रॅम व एक दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी घेऊन चोरटे मोटार सायकलवरून फरार झाले.याबाबतीत सतिष दंडनायक यांनी ढोकी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.