धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धसमेगाव ता. वाशी जि. धाराशिव पदाधिकारी समाधान उघडे यांनी आपल्या खासगी शेतीमध्ये अफूची बेकायदेशीर लागवड केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली असून, त्यांच्या या कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे.

 शिवसेना हा शिस्तप्रिय आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करणारा पक्ष आहे. पक्षाच्या विचारसरणीला आणि शिस्तीला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात कधीही थारा दिला जात नाही. समाधान उघडे यांनी केलेले कृत्य हे अत्यंत गंभीर असून ते संघटनेच्या शिस्तीला तडा देणारे आहे.  त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार समाधान उघडे यांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात येत आहे. यापुढे त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नसेल, याची सर्व शिवसैनिकांनी नोंद घ्यावी.


 
Top