परंडा (प्रतिनिधी)- देशाच्या विकासासाठी संशोधन महत्वाचे आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी घेऊन प्रत्येक विषयामध्ये संशोधन करावे असे प्रतिपादन बलभीम महाविद्यालय बीड येथील प्राचार्य डॉ.संतोष उंदरे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सी.व्ही.रमण व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. व्याख्यानमालेमध्ये उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. संतोष उंदरे बोलत होते. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली डॉ.सी.व्ही.रमण व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने उपस्थित होते.व्यासपीठावर प्राचार्य डॉ.संतोष उंदरे दयानंद महाविद्यालय लातूर येथील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.महादेव पांडगे ,शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय लातूर येथील डॉ रविकिरण बिराजदार, उप प्राचार्य डॉ.महेशकुमार माने मराठी विभाग प्रमुख डॉ.गजेंद्र रंदील डॉ.अक्षय घुमरे डॉ. विद्याधर नलवडे,  सायन्स फोरमचे चेअरमन डॉ.अमर गोरे पाटील कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.शहाजी चंदनशिवे व डॉ.अक्षय घुमरे यांनी करून दिला यावेळी डॉ.महादेव पांडगे यांनी रमन इफेक्ट इन स्पेस अँड ऍस्ट्रोफिजिक्स या विषयावर पीपीटी द्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानाचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.विद्याधर नलावडे यांनी केले या कार्यक्रमासाठी पदवी पदव्युत्तर विद्यार्थी संशोधक विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी डॉ.सचिन चव्हाण यांनी आभार मानले.


 
Top