भूम (प्रतिनिधी)- शहरातील राणी ताराराजा शाळेत व बसस्थानकात मराठी दीन साजरा करण्यात आला.
दरम्यान राणी ताराराजा शाळेत वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमांचे अध्यक्ष संतोष वीर,जीवनराव गोरे व शाळा वायवस्थापन समिती अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक उषाताई विरधे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कार्यक्रमांचे प्रास्ताविक शीतल राऊत यांनी केले. व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात माझा मना मधी शिवबा च नाव र ,मराठी गौरव गीत याने करण्यात आली दरम्यान एकविरा आई तू डोंगरा वरी या गाण्यावर
वैष्णी महामुनी,स्वरा गवळी,वैष्णवी माळी,ईश्वरी भोसले,प्रांजली शेटे, प्रांजल खेत्रे,अहिल्या गोरे,आरोही साठे व समीक्षा जाधव यांनी एकत्रित नृत्य सादर केले. या नृत्याने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सदरील कार्यक्रमाचे आभार परमेश्वर धुमाळे यांनी मानले.
यानंतर शहरातील बसस्थानकात ही मराठी दिना निमित्त स्थानकातील प्रवासी बांधवांना फुल व पेढे वाटून साजरा करण्यात आला. यावेळी आगार प्रमुख उल्हास शिनगारे,वाहतूक , वाहतूक निरीक्षक नागेश गायकवाड, रोहित बागडे,मुकेश भगत यांच्या सह नागरिक उपस्थित होते.
