धाराशिव (प्रतिनिधी)- जागजी (ता.धाराशिव) शिवारातील एनव्हीपी शुगर प्रा.लि. या गुळ पावडर कारखान्याच्या व्दितीय गळीत हंगामाची शुक्रवार, दि. 27 फेब्रुवारी रोजी सांगता झाली. या हंगामात अवघ्या 119 दिवसांत तब्बल 1 लाख 18 हजार मे.टन ऊस यशस्वीरीत्या गाळप केले आहे. कारखान्याचे मार्गदर्शक श्री.आप्पासाहेब पाटील तसेच सर्व खातेप्रमुख, तोडणी-वाहतूक ठेकेदार, कर्मचारी यांच्या हस्ते गव्हाणपूजन करून गळीत हंगामाची सांगता करण्यात आली.
सन 2025-26 च्या व्दितीय गळीत हंगामात एनव्हीपी शुगरला कारखाना कार्यक्षेत्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे गळीत हंगामाच्या सुरूवातीपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऑक्टोंबर महिन्यात संत-महंतांसह सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला होता. परंतु अतिवृष्टीमुळे ऊसफडात वाहने घेवून जाणे आणि तोडणी करताना अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली. तरीही चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांच्या कुशल नियोजनामुळे अवघ्या 119 दिवसांत गळीत हंगामात 1 लाख 18 हजार मे.टन गाळप यशस्वीपणे पूर्ण करणे शक्य झाले. तसेच चाचणी हंगामापासून शेतकर्यांनी गाळपासाठी ऊस दिल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत म्हणजेच दर महिन्याच्या 1 व 16 तारीखेस संबंधित शेतकर्यांच्या खात्यात ऊसबिल जमा करून शेतकर्यांचा विश्वास संपादन केलेला आहे.
याप्रसंगी जागजी येथील प्रगतशील शेतकरी राजाभाऊ देशमुख, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, चिफ इंजिनिअर ओंकार मोकाशे, चिफ केमिस्ट उमेश बिक्कड, मिल फोरमन प्रवीण पाटील, विजय वाघे, अमर पुंड, सेल्स ऑफिसर सागर शिंदे, परचेस अधिकारी रविकांत जोगदंड, इ.इंजिनिअर प्रविण यादव, अजय गाडे, लेबर ऑफिसर शुभम सावंत, हार्वेस्टर मालक हेमंत देशमुख, वाहतूक ठेकेदार पद्माकर शिंदे, किरण कुर्हाडे, नवनाथ तोंडे, रामभाऊ मिसाळ, शिवाजी सुरवसे, शेतकी विभागाचे राजाभाऊ केवळराम, संभाजी चोरमले, अक्षय माने, बालाजी गुळवे, तसेच सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
तोडणी वाहतूक ठेकेदारांचा सन्मान
व्दितीय गळीत हंगामात ऊस तोडणी-वाहतूक केलल्या तोडणी वाहतूक ठेकेदारांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षिस देवून यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रथम श्री.रोहिदास अप्पाराव पवार, (2172 मे.टन), द्वितीय श्री.अविनाश मनोहर भोरे (1790 मे.टन), तृतीय श्री.भजनदास लाला जमाले (1766 मे टन), तसेच हार्वेस्टर मागील वाहनांमध्ये प्रथम श्री.शरद शहाजी काटे (1395 मे टन), द्वितीय श्री. ज्ञानेश्वर बालाजी नवले (1302 मे टन), तृतीय श्री.किरण राजेंद्र इंगळे (1183 मे टन) या सर्व वाहतूक ठेकेदारांचा सत्कार करण्यात आला.
ऊस उत्पादक शेतकर्यांचे मानले आभार
एनव्हीपी शुगरचा व्दितीय गळीत हंगाम यशस्वी करण्यात मोठा वाटा असलेल्या ऊस उत्पादक शेतकर्यांबरोबरच उन्हात, पावसात आणि प्रतिकूल परिस्थितीत कष्टकरी ऊसतोड कामगारांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळेच हा हंगाम यशस्वी झाला. हा हंगाम यशस्वी करण्यासाठी योगदान देणार्या प्रत्येक खातेप्रमुख, कर्मचारी, शेतकरी बांधवांचे त्यांनी गळीत हंगाम सांगताप्रसंगी कारखान्याच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
