धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 05.02.2026 रोजी दुपारी सुमारे 3:09 वाजण्याच्या सुमारास कळंब, जिल्हा धाराशिव परिसरात भूगर्भातून गूढ आवाज होऊन भूकंपासारखा धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती.

सदर घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाने तात्काळ राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविली. त्यांच्या तपासणीनुसार या परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे सदरील घटना भूगर्भातील नैसर्गिक आवाजाचा प्रकार असण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यासह शेजारील काही जिल्ह्यांमध्येही मागील काही दिवसांपासून अशा प्रकारचे भूगर्भातील आवाज येत आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्क राहावे व प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचेअनुपालन कराव. अफवांवर विश्वास ठेवू नये.

- कीर्ति किरण पुजार

जिल्हाधिकारी धाराशिव.


 
Top