उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गणातील निवडणुकीचा प्रचार गुरुवारी दि.5 रोजी रात्री दहा वाजता समाप्त झाला. निवडणूक विभागाने मतदान प्रक्रियेची जय्यत तयारी सुरू केली असून शनिवारी दि. 7 रोजी तालुक्यातील एकूण 196 केंद्रांवर मतदान होणार असून, प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवार दि. 9 रोजी सकाळी आठ वाजता अंतुबळी सांस्कृतिक सभागृहात मतमोजणी होणार आहे.
तालुक्यातील एकूण नऊ गटात एक लाख 72 हजार 698 मतदार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या 81 हजार 398 तर पुरुष मतदार 91 हजार 297 आहेत व इतर मतदारांची संख्या 3 आहेत. तालुक्यात 196 मतदार केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रावर एक केंद्राध्यक्ष तीन मतदार अधिकारी, एक पोलीस कर्मचारी असे पाच कर्मचारी राहणार असून, एकूण 980 कर्मचाऱ्यांचा सर्व केंद्रावर सहभाग असणार आहेत.18 क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत तर 19 निवडणूक कामकाज कार्यालयीन पथक राहणार असून 3 फिरते पथक कार्यरत राहणार असून 5 चेक पोस्ट करण्यात आले आहेत.कर्मचाऱ्यांना मतदार केंद्रात पोहचवीने व आणण्यासाठी 14बस,14 स्कूल बस, व 11 जीप असे एकूण 39 वाहन ठेवण्यात आले आहेत.दिव्यांगासाठी स्वतंत्र मतदान केंद्र नसले तरी ज्या मतदान केंद्रावर दिव्यांग असतील त्यांच्यासाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वच केंद्रावर लाईट ,पाणी, व्यवस्था केली करण्यात आलेली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली आहे.
शहरातील अंतू बळी पतंगे सभागृहात मतदान यंत्र सिलिंगचे काम चालू आहे. सर्व मशीनची तपासणी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून शुक्रवारी नियुक्त केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन व इतर साहित्यसंह पाठवण्यात येणार असून व सोमवारी मत मोजणी 18 टेबलवर होणार आहे. दरम्यान मतदानच्या दिवशी सर्वच मतदान केंद्रावर 414 पोलीस व होमगार्डची नियुक्ती करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक प्रल्हाद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्ताचे तगडे नियोजन करण्यात आले आहे.