तुळजापूर (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर, आज आपसिंगा (ता. तुळजापूर) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस (आय) आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा पार पडली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

विकासाचा ठोस लेखाजोखा सभेला संबोधित करताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून परिसरात झालेल्या विकासकामांची माहिती जनतेसमोर मांडली. त्यांनी प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर प्रकाश टाकला: पायाभूत सुविधा: रस्ते, पाणीपुरवठा आणि वीज प्रश्नांची केलेली सोडवणूक लोककल्याण: आरोग्य सुविधा, शिक्षण आणि ग्रामविकासासाठी राबवलेले प्रकल्प  शेतकऱ्यांसाठी मूलभूत सोयी आणि युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम महिला सक्षमीकरण: ग्रामीण भागातील महिलांच्या उन्नतीसाठी घेतलेले ठोस निर्णय “आम्ही केवळ आश्वासनांचे राजकारण करत नाही, तर प्रत्यक्ष कामाच्या जोरावर मते मागत आहोत. आमचे उमेदवार निवडून आल्यावर जनतेच्या अडचणीच्या वेळी कायम उपलब्ध राहून सेवा करतील,“ असे ठाम प्रतिपादन खासदार निंबाळकर यांनी यावेळी केले.

आघाडीचे अधिकृत उमेदवार या सभेच्या माध्यमातून सिंदफळ गट आणि गणांमधील उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला सौ. विश्रांती संजय शितोळे (अधिकृत उमेदवार, सिंदफळ जिल्हा परिषद गट)श्रीमती सविता अरविंद नवगिरे (अधिकृत उमेदवार, सिंदफळ पंचायत समिती गण) सौ. सोनाली यशपाल सिरसट (अधिकृत उमेदवार, आपसिंगा पंचायत समिती गण) ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांचे हक्क यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सदैव कटिबद्ध राहिला आहे. भविष्यातही न्याय आणि लोकहितासाठी हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी उमेदवारांनीही पारदर्शक कारभार आणि प्रामाणिक लोकसेवेची ग्वाही मतदारांना दिली.या सभेस शिवसैनिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top