तुळजापूर (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर आज तीर्थ (बु.) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस आय आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांचा समाचार घेतला.
केलेल्या कामांचा लेखाजोखा आणि विकासाचा निर्धार सभेला संबोधित करताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “आम्ही केवळ आश्वासने देणारे नाही, तर प्रत्यक्ष काम करणारे लोक आहोत. गेल्या काही वर्षांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून तीर्थ परिसरात रस्ते, शुद्ध पाणीपुरवठा, वीज आणि आरोग्य सुविधांचे जाळे विणले आहे. शेतकऱ्यांच्या मूलभूत सोयींपासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत प्रत्येक स्तरावर आम्ही ठोस काम केले असून, याच कामांच्या जोरावर आम्ही जनतेसमोर आलो आहोत.“ सभेमध्ये खासदार निंबाळकर यांनी खालील विषयांवर विशेष भर दिला: रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक शेतीसाठी सिंचन आणि इतर आवश्यक सुविधांचे बळकटीकरण युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम आणि महिलांच्या हक्कांचे संरक्षण पारदर्शक कारभार: आगामी काळातही न्याय आणि लोकहितासाठी लढण्याचा निर्धार यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ. रूपाली विजय डोंगरे, सौ. सोनाली किरण डोंगरे आणि सुरेश शिवाजीराव कोकरे यांनीही जनतेशी संवाद साधला. “निवडून आल्यानंतर सामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, तसेच पारदर्शक व प्रामाणिक कारभाराची ग्वाही देतो,“ असे आश्वासन उमेदवारांनी यावेळी दिले. जनतेचा उदंड प्रतिसाद या प्रचार सभेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच तीर्थ परिसरातील नागरिक, शेतकरी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेतील उत्साह पाहता महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे.
%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87%20%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%93%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0.jpeg)