धाराशिव (प्रतिनिधी)- मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने आज धाराशिव शहरातील साहित्यिक, कवी, पत्रकार यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, सहकार सेनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कोठावळे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बचाटेसर, शिक्षक सेनेचे नेते बाबासाहेब वाघमारे, मनसे तालुकाध्यक्ष सलीम औटी, मनसे कळंब तालुकाध्यक्ष प्रभाकर धुमाळ आदी उपस्थित होते.
