मुरूम (प्रतिनिधी)- भुसणी, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाऊन उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी आपला मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन करताना म्हणाले की, लोकशाही मजबूत करण्यासाठी केवळ चर्चा करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे गरजेचे आहे. आपले एक मत गावाचा आणि तालुक्याचा विकास ठरवू शकते. मतदान हा केवळ अधिकार नसून, ते प्रत्येक नागरिकाचे संविधानिक कर्तव्यच आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी घराबाहेर पडा आणि लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
