धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आज धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी गोवर्धनवाडी येथील मतदान केंद्रावर सपत्नीक उपस्थित राहून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला.
मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांनी रांगेत उभं राहून लोकशाही प्रक्रियेचे पालन केले. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “लोकशाही व्यवस्थेचा कणा म्हणजे मतदान आहे. प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे, कोणत्याही दबावाशिवाय आणि पूर्ण जबाबदारीने मतदान करून आपली लोकशाही अधिक सुदृढ आणि मजबूत करणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी आणि सुज्ञ प्रतिनिधी निवडले जावेत असे आवाहन यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले.
आमदार कैलास पाटील यांचे सारोळ्यात मतदान
शिवसेना उबाठा गटाचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव तालुक्यातील सारोळा येथे आपले मतदान कर्तव्य बजावले. लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे त्यांनी सांगितले.


