कळंब (प्रतिनिधी)- संत मदर तेरेसा माध्यमिक विद्यालय, ता. कळंब जि. धाराशिव या विद्यालयाने  2025 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. एकूण 34 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी तब्बल 29 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या प्रमाणे  गुणवंत विद्यार्थ्यांची

यश महेश वाघमारे , देवयानी दत्ता पवार , अक्षरा दत्ता इके ,आर्या दिपक धावरे ,पंकजा गजेंद्र जवंजाळ , श्रेया बालाजी गुंड,श्रीलेश मधुकर बाकले ,विराज विजयकुमार मस्के ,सुहान लतीफ शेख ,समर्थ विलास डिकले ,श्रद्धा सुदर्शन कोळपे ,यशवर्धन दत्ता शेवडे ,रूही बोद्धीसत्व वाघमारे ,गायत्री संतोष पुरी ,प्रांजली नामदेव झाडे ,मयंक संजीवन सरवदे ,देव उमेश शिंदे ,ऋतुराज ज्ञानेश्वर गायकवाड ,समृद्धी शंकर डोळे ,सार्थक कल्याण कांबळे ,सौरभ समाधान कोठावळे ,अश्विन अविनाश कांबळे ,अस्मिता सतीश काळे ,संस्कृती धर्मराज काळे ,अंकिता अरुण माळी ,रुद्रप्रताप सुरेश शिंदे ,सृष्टी दत्तात्रय तनपुरे ,

सुबोध अश्रूबा राऊत ,सोनाक्षी दीपक धावारे या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे प्रमुख श्री. अंगदराव चव्हाण साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी. ए. चव्हाण सर, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ व पालक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा पाठिंबा यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 
Top