भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवी संमेलन घेण्यात आले ;या कवी संमेलनाचे प्रमुख अतिथी एस पी कॉलेज भूम येथील प्रा . डॉ . गोविंद गरड होते .यावेळी शाळेतील चौदा विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या . कवितेचे विषय हे आई -वडील ,शेतकरी , पाळीव प्राणी असे होते .कविता हृदयाला भिडणाऱ्या होत्या . या बालकवींनी कवितेतून शाळेतील संपूर्ण वातावरण शब्दबद्ध केले होते .तसेच शेतकऱ्याला किती कष्ट सोसावे लागते . याचेही वर्णन केलेले होते . प्रमुख अतिथी यांनी आपल्या कवितेतून मुलांच्या लग्नाचा विषय अतिशय समर्पकपणे उभा केला होता .कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे होणारे फायदे सांगून संपूर्ण इतिहास सांगितला . खर्च करणार आहे ही विद्रोही कविता सादर केली . कार्यक्रमाला काकासाहेब पवार ,दयानंद पाटील , उत्रेश्वर पायघन ,अविनाश जोशी , राजेंद्र गाडे , दत्तात्रय गुंजाळ ,प्रतिभा मुकटे मॅडम , सुनील जाधवर ,नितीन पवार ,कैलास शिंदे ,हरीश साठे ,सागर आकोस्कर ,अनंता झरकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले तर आभार राजेंद्र गाडे यांनी मानले .
