कळंब (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यात महिला सबलीकरणाचा पाया रचला. त्यांनी स्त्रियांना सन्मान देवून त्यांचे संरक्षण केले असे प्रतिपादन लोकव्याख्यानकार प्रा.विशाल गरड यांनी केले. ते कळंब येथील शिवसेवा तालीम संघाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत “शिवचरित्रातून महिला सबलीकरण” या विषयावर बोलत होते. पुढे बोलताना प्रा.गरड म्हणाले की. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यासोबत माँसाहेब जिजाऊ, महाराणी येसूबाई, महाराणी ताराराणी यांचाही पराक्रम सांगणे काळाची गरज आहे. शिवरायांना चारित्र्य संपन्न राजा म्हणतात याचेश्रेय जिजाऊंना जाते. आजच्या आधुनिक मावळ्यांनी स्त्रियांचा सन्मान करून त्यांना समतेने वागवले पाहिजे.
यावेळी व्यासपीठावर,सभापती शिवाजी कापसे,नगर अध्यक्ष सौ.सुनंदा ताई शिवाजी कापसे, प्रतिष्ठित व्यापारी बंडोपंत दशरथ यांच्या सह शहरातील महिला, उद्दोजक, व्यापारी उपस्थित होते.यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमांचे संचलन प्रा. गपाट यांनी तर आभार सुशील तीर्थकर यांनी मानले.
शिवभूषण पुरस्कार प्रदान
कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा शिवभूषण पुरस्कार, यंदा शिवसेवा तालीम संघ यांना जाहीर झाला होता.याच कार्यक्रमात हा पुरस्कार शिवाजी कापसे,सुशील तीर्थकर यांच्या सह तालीम संघाचे सर्व कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात आला.या मध्ये सन्मानपत्र, ऊर्जस्तंभ पुस्तक,शाल,याचा समावेश होता.या वेळी कळंब तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
