धाराशिव (प्रतिनिधी)- अविनाश खापे यांचे निलंबन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अखेर रद्द करण्यात आले आहे. निलंबन रद्द केल्याचे पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पाठवले आहे.
पक्षाच्या हितासाठी खापे यांनी आवाज उठवला होता. कार्यवाही होऊ नये यासाठी त्याच दिवशी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडे शिवसेना प्रवक्ते योगेश केदार बोलले होतो. पालकमंत्र्यांनी देखील कार्यवाही होणार नाही, झाला गेला विषय संपला. आपण पक्षासाठी काम करू असे म्हटले होते. तरी तीन-चार दिवसांनी कारवाई केली गेली. यातून शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती. आम्ही योग्य त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला होता असे योगेश केदार यांनी सांगितले.