धाराशीव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे युरोप कृषी अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनामध्ये बुधवारी (दि.11) जिल्हाधिकारी श्री.पुजार, जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र मोरे यांनी सत्कार करून युरोप कृषी अभ्यास दौऱ्यासाठी श्री. रणदिवे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 
Top