धाराशिव (प्रतिनिधी)-   महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेत (एमपीएससी ) उत्तीर्ण होऊन कृषी अधिकारी वर्ग 2 पदी निवड झाल्याबद्दल साक्षी संजय परदेशी यांचा धाराशिव येथे इंडिया को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

साक्षी मूळची शिराढोण (ता. कळंब) गावची नात असून चाकण (ता. खेड जि. पुणे) येथील रहिवासी आहे. साक्षी हिचे शिक्षण चाकण येथील परदेशी इंग्लिश मीडियम स्कूल तर उच्च शिक्षण संभाजीनगर व लातूर येथील ॲग्रीकल्चर कॉलेजमध्ये झाले. महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेमध्ये साक्षी हिने पहिल्याच प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला. कृषी अधिकारी वर्ग दोन पदी तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल धाराशिव येथे इंडिया को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी साक्षी यांच्या मातोश्री रेश्मा परदेशी तसेच धाराशिव येथील प्रमोद सोनवणे, अनिता क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.


 
Top