धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर मुख्य प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात प्रा. डॉ. हरिदास फेरे, प्राचार्य, वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी यांचे  जागतिक सहस्राकाचे भारतीय महानायक या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. विद्यापीठ उपपरिसराचे  संचालक, प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. 

प्रा. डॉ. हरिदास फेरे, यांनी आपल्या विशेष व्याख्यानात “जागतिक सहस्रकाचे भारतीय महानायक: छत्रपती शिवाजी महाराज “ या विषयावर आपले मत मांडले. लोकशाहीच्या काळात सुद्धा त्यांचे कार्याचे महत्व जाणवते. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाही मुल्य जपले. त्यांनी स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेतली पाहिजे. भविष्याची दिशा निश्चित केली पाहिजे. त्यांनी देशासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. छत्रपती शिवाजी महाराज जागतिक सहस्रकाचे भारतीय महानायक आहेत. मानवतेचे मुल्य रुजविले. तानाजी मालुसरे यांनी अभेद्य कोढांणा किल्ला जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावून लढले, स्वराज्य वरील निष्ठा प्रखर , अढळ होती.  कर्तव्य प्रामाणिक भावनेने कार्य करणारे सरकारी लाभले. हिरोची इंदलकरांनी किल्ले निर्मितीत महत्वपूर्ण योगदान दिले. महाराजांना निष्ठावंत सवंगडयांचे सहकार्य लाभले. प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्वराज्य विषयी प्रेम निर्माण केले. लोकशाहीतील सर्व मुल्ये स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जपले.  न्यायाच्या तत्वावर त्यांनी राज्यकारभार केला. स्वराज्य सामान्य माणसांच्या हितासाठी होते. महान मूल्यांचे संवर्धन केल्यास लोकशाही मजबूत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

संचालक, प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी प्रामाणिकपणा, निष्ठेने आपले कार्य केले पाहिजे.  डॉ. गणेश शिंदे, समन्वयक, विद्यार्थी विकास विभाग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. जितेंद्र शिंदे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमास शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top