भुम (प्रतिनिधी)-  अखिल भारतीय नागरीसेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने यावर्षी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन मंडी हिमाचल प्रदेश येथे दिनांक 26 ते 28 फेब्रुवारी  या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेत विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये 72 किलो वजन गटात भूम तालुक्यातील घुलेवाडी येथील पैलवान  महेश घुले  यांची निवड झाली आहे. 

त्यांच्या या निवडीबद्दल वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्यासह  पैलवान  बिभीषण वाघमोडे, वस्ताद मामू जमादार, अशोक वाघमोडे, वस्ताद तात्यासाहेब बहिर, अमोल वीर, पैलवान  दत्ता मेटे, पैलवान  बाळु सुबुगडे, पैलवान  मंगेश घुले, पैलवान  अनिल दाबेकर, पैलवान  आप्पा चव्हाण, बापुराव घुले, संभाजी घुले, सुरेश घुले, जोतीराम घुले, दत्तात्रय गोपाळघरे, संदीप घुले, विलास घुले, गणेश घुले, पैलवान  संभाजी दाबेकर, पैलवान  बालाजी हराळ यांनी महेश घुले यांचे कौतुक करून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top