तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तीर्थक्षेत्र येथे मंगळवारी भरणारा आठवडा बाजार रद्द करून तो बुधवारी भरविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे मंगळवार दि. 17 फेब्रुवारीपासून नवीन आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. सध्या या आठवडी बाजारास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या नव्या उपक्रमामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना मंगळवारीच खरेदीची सुविधा उपलब्ध झाली आहे बाजारासाठी येणाऱ्या सर्व व्यापारी बांधवांना गावातील ग्रामस्थांकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मंगरूळ ग्रामस्थांनी दिली आहे. गावातील शेतकरी, भाजीपाला विक्रेते, किरकोळ व्यापारी तसेच विविध वस्तूंचे विक्रेते यांना या बाजारामुळे मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण अर्थचक्राला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी या आठवडी बाजाराचा लाभ घ्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन मंगरूळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. मंगळवारी खरेदीसाठी आता मंगरूळ हाच नवा पर्याय ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 
Top