परंडा (प्रतिनिधी)- लोहारा जि.धाराशिव येथून अल्पवयीन मुलगी गेली 45 दिवसांपासून बेपत्ता आहे जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भेटून तात्काळ मुलीचा शोध घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन.अक्कलकोट तालुक्यातील सांगवी या ठिकाणी राहणारे गोसावी समाजाचे बाबू जाधव हे,उदरनिर्वाहासाठी धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात रहात होते,फिरस्ती विक्री करणे हा  त्यांचा व्यवसाय आहे,लोहारा शहरात छोटीशी झोपडी घालून शहरांमध्ये फिरस्ती अत्तर विकून आपला उदरनिर्वाह करतात.आपल्या घरी दोन मुले आणि तीन मुली असा त्यांचा परिवार आहे,ते भटक्या समाजाचे असून उदरनिर्वाहासाठी सगळीकडे फिरून अत्तर विकावे लागते दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी मोठी मुलगी किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर गेली.मात्र ती दिवसभर घरी परतली नाही.आई-वडिलांनी सर्वत्र शोध घेतला,नातेवाईकांशी संपर्क साधला तरीही तिचा पत्ता लागला नाही.अखेर लोहारा पोलीस ठाण्यात आई वडीलांनी तक्रार दाखल केली.संबंधित किराणा दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार,मुलीने त्यांचा फोन वापरून एका मुलाशी संपर्क साधला आणि तो मुलगा तिला तेथून घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

सदर मुलगी 12वर्षे9महिने वयाची असून अल्पवयीन आहे.त्यामुळे संबंधित मुलाचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करावी,अशी मागणी ॲड.अरुण आबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी च्या शिष्टमंडळाने केली.मुलीचा शोध लागला नाही तर धाराशिव येथे मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा राज्य प्रवक्ते ॲड.नगरसेवक अरुण जाधव यांनी दिला.

यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे,धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के,महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे,युवकाध्यक्ष शितल चव्हाण,जिल्हा महासचिव नसीर शेख,जिल्हा उपाध्यक्ष महादेव एडके,जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंदुरकर,विधी सल्लागार ॲड.के.टी. गायकवाड,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कुंदन वाघमारे,जिल्हा संघटक कश्यप बनसोडे,युवक सदस्य जीवन कदम,मिलिंद रोकडे, मच्छिंद्र जाधव,अक्कलकोट तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे,विद्यार्थी संघटना राज्यपूर्वक्ता रविराज पोटे,यशवंत इंगळे,हनुमंत जाधव तसेच धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top