धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आई तुळजाभवानी व संत गोरोबाकाका यांच्या आशीर्वादाने तेर व केशेगाव जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण महिला प्रवर्गात भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
तळागाळातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास, पारदर्शकता व लोकहित या मुद्द्यांवर ही निवडणुक आपण लढवणार असून, भाजपा महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांना अधिक बळ देण्याचा संकल्प यानिमित्ताने व्यक्त केला. आदरणीय डॉ. पद्मसिंह पाटील यांनी दाखवलेल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या मार्गाला पूर्णत्व देण्यासाठी ही उमेदवारी निश्चितच महत्त्वाची ठरणार असून, यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व लाभणार आहे. जनतेच्या विश्वासावर व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर ही निवडणूक लढवून मतदारांच्या प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेत ठाम व प्रभावी आवाज उठवला जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त केला. यावेळी रेवणसिद्ध लामतुरे, लिंबराज टिकले, सुरेश देशमुख यांच्यासह तेर व केशेगाव गटातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
