उमरगा (प्रतिनिधी)- पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती ॲड.आकांक्षा चौगुले यांनी सभापती निवडीनंतर लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांच्या कामास सुरुवात केली. भगतवाडी कोळेवाडी चिरेवाडी या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विषयास अनुसरून नागरिकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार दिल्या होत्या व मागील दहा दिवसापासून येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बलभीम इरले व बालाजी करणुरे हे ग्रामस्थ आमरण उपोषनास बसले होते.
या अनुषंगाने शनिवार दि.07 मार्च रोजी सभापती अँड.आकांक्षा चौगुले यांनी काळेवाडी येथे उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेतल्या. व त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने चौकशी करून आठवड्याच्या आत अहवाल सादर करावा अशा सूचना प्रशासनास दिल्या. त्यांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी नारळ पाणी घेऊन आपली उपोषण स्थगित केले. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी, नगरसेवक पंढरीनाथ कोणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
