कळंब (प्रतिनिधी)-  दहावी बोर्ड परिक्षा सुरू असताना तसेच उन्हाळ्यात वीजेची मागणी जास्त असताना कळंब शहरात महावितरण कंपनीच्या स्मार्ट मीटर प्रणालीमुळे शेकडो ग्राहकांचा वीज पुरवठा बंद केला. थकीत बिलांमुळे वीज पुरवठा बंद केला असल्याचे कारण महावितरण कंपनीने पुढे केले. महावितरणचा निषेध म्हणून कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी महावितरण कंपनीच्या कळंब कार्यालयाच्या दारात होळी दिवशीच वीज बिलांची होळी करून महावितरण कंपनीच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला.

कळंब महावितरण कडे दाखल केलेल्या तक्रार अर्जात तीन प्रश्न विचारले गेले. कळंब शहरात घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांची एकुण संख्या किती आहे. त्यापैकी किती ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले गेले ? ज्या ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले गेले त्यांची स्मार्ट मीटर बसवण्यासाठी पुर्वपरवानगी घेतली होती का ? कळंब शहरातील स्मार्ट मीटर ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्यापुर्वी महावितरण कंपनीच्या कळंब कार्यालयाने कळंब शहरातील घरगुती वीज वापर करणाऱ्या सर्व स्मार्ट मीटर ग्राहकांना थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा वरिष्ठ पातळीवरून आपोआप बंद होणार आहे. याबाबत कळंब शहरात जनजागृती करुण माहिती दिली होती का ? याचा लेखी खुलासा महावितरण कंपनीने करावा. अशी मागणी कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी महावितरण कंपनीच्या कळंब कार्यालयाकडे केली आहे.

 
Top