धाराशिव (प्रतिनिधी)- आज दि. 8 मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे वतीने गुढी पाडव्यानिमित्त सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटपाचा शुभारंभ प्रा. भालचंद्र हुच्चे व उद्योजक शरद जाधव यांच्या हस्ते सभासद अनिलकुमार अजमेरा व माणिकराव खोचरे यांना साखरेचा कट्टा देऊन करण्यात आला.

या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष अरविंद  गोरे, व्हाईस चेअरमन हनुमंत भुसारे, संचालक ॲड. निलेश बारखेडे पाटील, आबासाहेब देशमुख, युवराज राजे निंबाळकर, दिलीप गणेश,पुष्पकांत माळाळे, राजाभाऊ पाटील, जयंत  शिंदे, किसन मते, सदाशिव आप्पा कोळगे, बाळासाहेब मैरान, वैजनाथ गुळवे,तसेच कारखान्याचे कर्मचारी गायकवाड, डोके, मंडलिक आदी उपसस्थित होते. ही साखर वाटप श्री तुळजाभवानी स्टेडियम, सुनील प्लाजा येथे व आंबेडकर चौकात युवराज लॉज जवळ 8 मार्च ते 17 मार्च 2026 या कालावधीत सुरु राहील याची नोंद सभासदांनी घ्यावी. असे आवाहन कारखान्याचे वतीने करण्यात येत आहे.    

 
Top