धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह-2026 अंतर्गत यशस्वीरित्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सुरक्षितते विषयी माहिती देण्यात आली. स्वयंपाक घर, रस्ते तसेच देशाची सुरक्षा याविषयी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. मुख्यत्वे “रस्ता सुरक्षा” अंतर्गत वाहतूक नियमांचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. राहुल खोब्रागडे, विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, अध्यक्ष डॉ. मनिषा असोरे विभागप्रमुख शिक्षण शास्त्र विभाग, डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. जितेंद्र शिंदे, कार्यक्रमा धिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांची प्रमुख उपस्थिती व्यासपीठावर होती.
डॉ. मेघश्याम पाटील यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह उद्देश त्यांनी स्पष्ट केला. रस्ता सुरक्षा नियम पाळल्यास अपघात टाळता येतील असे ते म्हणाले. तसेच इतर प्रकारच्या सुरक्षितेवरही त्यांनी प्रकाश टाकला. प्रमुख अतिथी डॉ. राहुल खोब्रागडे यांनी रस्ता अपघाताची आकडेवारी मांडत त्याच्या परिणाम कुटुंबातील इतर घटकावर काय होतो हे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण शास्त्र विभागातील विभागप्रमुख डॉ. मनीषा असोरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.जितेंद्र शिंदे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
