धाराशिव (प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाचे तुळजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते तसेच जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे यांनी मंगरूळ जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह तुळजापूर येथे भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम प्रशासनावर, महायुती सरकारच्या लोकाभिमुख व विकासाभिमुख धोरणांवर तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या जिल्ह्यातील सातत्यपूर्ण विकासकामांवर प्रभावित होऊन हा प्रवेश करण्यात आला.
या सामूहिक प्रवेशामुळे तुळजापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीची संघटना अधिक मजबूत होत असून, काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपच्या विकासाच्या राजकारणावर वाढता विश्वास अधोरेखित होत आहे. या सर्व मान्यवरांचे भाजप परिवारात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रवेशप्रसंगी दत्ता कुलकर्णी, सुनील चव्हाण, विनोद गंगणे, किशोर गंगणे, विक्रमसिंह देशमुख, विजय शिंगाडे, अमोल राजेनिंबाळकर, आबासाहेब सरडे, मनोज माडजे, राहुल साठे, प्रणेश देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
