वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीच्या निमित्ताने श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे झालेल्या विविध स्पर्धांमध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
या विविध स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये कुमारी ईश्वरी सुधाकर डोरले हिने प्रथम क्रमांक मिळवला तसेच गीत गायन स्पर्धेमध्ये संतोष चेडे, सुजित कवडे आणि रोहन उंदरे यांच्या समूह गायनाला द्वितीय क्रमांक मिळाला.याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
या सर्व विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे डॉ. नेताजी देसाई, डॉ. पार्थराज क्षीरसागर, डॉ. चेतना जगताप मॅडम, प्रा. प्रेरणा पाटील मॅडम व महाविद्यालयातील त्यांना मदत करणारे सर्व प्राध्यापक यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक कदम तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
