कळंब (प्रतिनिधी)- कळंब च्या विकासासाठी आम्ही एकत्र येऊ,सर्वजण मला साथ देतील असा मला विश्वास आहे. व आदर्श गाव करण्यासाठी शहरातील जनतेने ही नगर परिषदला सहकार्य करावे, असे आवाहन नूतन नगराध्यक्षा सुनंदाताई शिवाजी कापसे यांनी केले.
कळंब येथील देशमुख प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी नगर अध्यक्ष यशवंत दशरथ हे होते.तर व्यासपीठावर अँड.दिलीप सिंह देशमुख, महादेव महाराज अडसूळ,पांडुरंग गुरव, सतीश टोणगे,दीपक हरकर,सौ.धनश्री ताई कवडे, उपस्थित होते.या वेळी शहराच्या विकासाठी आम्ही आपल्या सोबत असून,जनतेचे मूलभूत प्रश्न अग्रक्रमाने सोडवावेत असे अँड.दिलीप सिंह देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी देशमुख प्रतिष्ठान च्या वतीने नूतन नगराध्यक्षा व नगर सेवकांचा शाल, बुके, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी नूतन नगरसेवक उपाध्यक्ष लखन गायकवाड, बाबू चाऊस, रोहन पारख, हर्षद आंबुरे,भूषण करंजकर, शितल चोंदे, शीला पवार, आशाताई भवर, हरकर, योजना वाघमारे, रुकसाना बागवान, अर्चनाताई मोरे, आदि उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्र संचलन व आभार प्रतिष्ठानचे सचिव ॲड.पृथ्वीराज देशमुख यांनी मानले.
