धाराशिव (प्रतिनिधी)- पळसप येथील उबाठा शिवसेना पक्षाचे उपसरपंच राम लाकाळ, माजी सरपंच दगडू लाकाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य मंगेश माळी,  मोतीचंद फुटाणे यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वावर, भाजपा महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणांवर आणि कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

तसेच सामाजिक समता, संघटनात्मक बळकटीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांनी प्रेरित होऊन लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा संघटक सर्जेराव शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल कांबळे यांच्यासह बालाजी कांबळे, गोरोबा ताटे, रवी लोंढे, ओंकार पेठे व सुनील शिंदे यांनीही भाजपात प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेला पाठिंबा दिला.

या सर्वांचे भाजप परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे पळसप व परिसरात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत होत असून, तळागाळातील कार्यकर्त्यांचा भाजपा महायुती सरकारच्या विकासाच्या राजकारणावर वाढता विश्वास अधोरेखित होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नव्याने पक्षात आलेले कार्यकर्ते प्रभावीपणे योगदान देतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.  या प्रवेशप्रसंगी नितीन काळे, संपतराव डोके, विजय हाऊळ, प्रवीण माळी, प्रदीप शिंदे,अशोक वीर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top