धाराशिव (प्रतिनिधी)- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र “दर्पण“ ची सुरुवात केली.6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवसानिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, संपादक विभीषण लोकरे,राजू गंगावणे, पत्रकार प्रवीण पवार,जिल्हा माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक नंदू पवार व आशा बंडगर,वाहन चालक मोहन कोळी कनिष्ठ लिपिक दिलीप वाठोरे,चित्रा घोडके व अनील वाघमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.उपस्थितांनी सुद्धा प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केली.