भूम (प्रतिनिधी)- मुला मुलींचा लिंग गुणोत्तर दर हा समतोल राहणे समाजाच्या दृष्टीने महत्वाचे आह़े असे मत भूम येथील अतिरिक्त सत्र न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर भगवान पंडित यांनी पीसीपीएनडीटी कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
धाराशिवचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनुसार जिल्हा रुग्णालय धाराशिवचे जिल्हा शल्यचिकित्सक व ग्रामीण रुग्णालय भूमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शशिकांत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी, जनजागृती, लिंग गुणोत्तर,बेटी बचाव बेटी पढाव, गर्भधारणापुर्व व प्रसूतीपुर्व लिंगनिदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा1994 सुधारीत 2003 कार्यशाळा पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत भूम तालुक्यातील सोनोग्राफी केंद्रधारक, गर्भपात केंद्रधारक, स्त्रीरोगतज्ज्ञ, शासकीय व खासगी वैद्यकीय व्यावसायिक,आय एम ए.,फॉग्सी, निमा, तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी तसेच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी, ए.एन.एम कर्मचारी, आशा कार्यकर्ती, व ग्रामीण रुग्णालय भूमचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ.शशिकांत खराडे यांनी कार्यक्रामाचे प्रास्तावीक केले.
यावेळी पोलीस निरीक्षक कानगुडे, गट विकास आधिकारी वाझे, वैद्यकीय आधिकारी डॉ.सुळ, ॲड.रेणूका शेटे यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी एक मुलगी आणि दोन मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या तीन महिलांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून मानसन्मान करण्यात आला. सुत्रसंचलन समुपदेशक एस.डी. तटाळे यांनी केले. तर समुपदेशक मनोज सरवदे यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राम खैरे, विनोद काटे, लक्ष्मण काळे, धनंजय कुलकर्णी, सुग्रीव राख, टी. एस. काळे, मुंढे मुकुंद, ठवरे यांनी परिश्रम घेतले.
