परंडा (प्रतिनिधी)- परंडा नगर परिषद निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जाकीर सौदागर यांनी दुसऱ्यांदा शुक्रवारी (दि.२) रोजी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला.फुलांनी नगर परिषद कार्यालय सजवले होते .

येथील टिपू सुलतान चौकातून भव्य मिरवणूक काडून फटाके फोडून,जेसीबी द्वारा फुले, गुलाल उधळून स्वागत ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले मिरवणूक नगर परिषद कार्यालयाच्या प्रागंणात येताच प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा कांबळे यांनी सौदागर यांचा स्वागत व सत्कार केला.नगर परिषद सभागृहात ही सर्व स्तरातून सौदागर यांचा जंगी सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताअण्णा साळुंके, विकासरत्न प्रा.डॉ.तानाजीराव सावंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे सर, रिपाई प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, अनिल देशमुख ,दिलीप रणभोर, दत्ता रणभोर ,विशाल देवकर ,राजकुमार देशमुख , मसरत काझी ,माऊली गोडगे ,वाजीद दखनी , मतीन जिनेरी आदिसह आजी माजी नगरसेवक नागरिक मोठया संख्येत उपस्थित होते.पदभार स्वीकारताना नगराध्यक्ष जाकीर सौदागर म्हणाले की मी जे निवडणुकी मध्ये मतदारांना दिलेले आश्वासन मी पूर्ण करणार तसेच माझ्या घराचे दरवाजे सर्वांसाठी सदैव खुले असतील आणि माझा फोन सामान्य जनतेसाठी २४ तास उपलब्ध असेल सेवा,संवाद आणि समर्पण हेच माझे कर्तव्य असल्याचे म्हटले.

 
Top